देशातील ईएसआय कॉर्पोरेशनची आज सोमवारी चंदीगड येथे 190 वी बैठक पार पडली. या बैठकीत कर्नाटकातील बेळगावसह देशातील एकूण सात ठिकाणी नूतन ईएसआयसी हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगावसह देशातील शमशाबाद (तेलंगणा), बारामती (महाराष्ट्र), किशनघर -अजमेर (राजस्थान), बालासोरी (ओरिसा), कुरनूल (आंध्र प्रदेश) आणि ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) या ठिकाणी नवी ईएसआयसी हॉस्पिटल्स उभारली जाणार आहेत.
ईएसआय कॉर्पोरेशनच्या आजच्या बैठकीच्या अखेरीस भारतातील श्रमजीवींची सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यासंदर्भात पर्यावरण, वन आणि हवामान बदल तसेच कामगार आणि रोजगार खात्याचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट केले आहे. बेळगावात ईएसआयसी हॉस्पिटल व्हावे ही मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित होती.
The meeting took a decision to set up new ESIC hospitals in Belagavi (Karnataka), Shamshabad (Telangana), Baramati (Maharashtra), Kishangarh, Ajmer (Rajasthan), Balasore (Odisha), Kurnool (Andhra Pradesh) and Greater Noida (Uttar Pradesh).
— Bhupender Yadav (@byadavbjp) February 20, 2023
Sir 🙏 Ratnagiri district madhye kadhi chalu honar ESIC hospitals sicurity guard board na kadhi milnaar fayda