बेळगावातील कलाकार अनिरुध्द ठूसे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शीत केलेल्या ‘थोडी ओली पाने’ या शॉर्ट फिल्मला पुणे येथे आयोजित इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचे ४ थ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवासाठी एकूण १५० हून अधिक शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म होत्या. त्यापैकी ५२ फिल्म्स अंतीम फेरीसाठी निवडल्या गेल्या.
त्यातून बेळगावच्या अनिरुध्द ठूसे यांच्या ‘थोडी ओली पाने’ या फिल्मला चौथे पारितोषिक मिळाले आहे. मागील वर्षभरात या फिल्मला भारतातील विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
- कोलकाता येथील सत्यजित ऋत्विक मृणाल या फेस्टिव्हलमध्ये अनिरुद्ध ठूसे यांना ‘थोडी ओली पाने’ फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले होते. आता इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल मधील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.