बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा आंबा बेळगाव फ्रुट मार्केट मध्ये दाखल झाला असून समस्त आंबाप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. यंदाच्या हंगामातील पहिला आंबा ८ फेब्रुवारी रोजी बेळगाव बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे.
तब्बल ५ हजार रुपये डझन या दराने आंब्याचा लिलाव झाला असून बेळगाव फ्रुट मार्केट मधील एम. बी. देसाई अँड सन्स यांच्याकडे हापूसचे आगमन झाले आहे. विदेशी हापूसच्या ६ नगासाठी ३ हजार रुपये ते ४ हजार रुपये दर आहे तर पायरी आंब्याचा प्रति सहा नगासाठी १४०० रुपये असा दर आहे.
फ्रुट मार्केटमधील आंबा लिलाव प्रक्रियेत फळविक्रेते मेहमूद खानजादे,हनीफ जमखंडी,अमजद पठाण, शीतल जमखंडी, किशन,नुर हांचीनमनी आणि मल्लु यांनी सहभाग घेतला होता.
सदर हापूस आंबा मालवण येथील संदीप लोके,जगदीश गावकर आणि अमित अम्राडकर यांनी हापूस बेळगावच्या फळबाजारात पाठवला आहे.
यंदाच्या हंगामातील पहिला आंबा बेळगावमध्ये दाखल झाला असून आगामी १५ दिवसात आंब्यांची आवक वाढेल, अशी माहिती आंब्याचे व्यापारी नितीन देसाई यांनी दिली आहे.
आंब्याचा राजा हापूस बेळगावात दाखल
या मोसमातील हापूस आंबा बेळगावात दाखल
मोसमातील पहिला हापूस फ्रूट मार्केट मधील एम बी देसाई यांच्या दुकानात उपलब्ध pic.twitter.com/mQ6G3plsMI— Belgaumlive (@belgaumlive) February 8, 2023