बेळगाव लाईव्ह : ११९२ पासून तत्कालीन पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज विद्यानिकेतनजवळील पोलिस क्वॉर्टर्सच्या जागेमध्ये रीतसर सुरु करण्यात आले.
गुरुवार दि. १९ जानेवारी पासून पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाला नव्या कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. १९१२ मध्ये सुरु झालेल्या जुन्या इमारतीमधील साहित्य पहिल्यांदाच नव्या जागेत हलवण्यात आले आहे.
नव्या कार्यालयात पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींनी नवीन कार्यालयात कामकाजाचा शुभारंभ केला.
पोलिस मुख्यालयात असलेले टेबल, खुर्च्या, कागदपत्रे, ट्रेझरी यासह पोलिस कार्यालयातील सर्व ब्रिटीशकालीन साहित्य नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आले असून पहिल्यांदाच येथील पोलिसांचा बंदोबस्तही नव्या कार्यालयात हलवण्यात आला.
२०१५ साली पोलिस अधीक्षक कार्यालय मार्गावर पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले होते. मात्र आता जुनी इमारत कशासाठी वापरण्यात येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.