Saturday, April 20, 2024

/

टिप्परच्या धडकेत ट्रॅक्टर चालक युवक ठार

 belgaum

भरधाव टिप्पर ची धडक ट्रॅक्टरला बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) रा. विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर्स चालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ हा अपघात घडला आहे.

संतोष हुडेद हा आपला ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेताकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव खडीने भरलेल्या टिप्परने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर चालक संतोष हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला व संतोषवर टिप्पर मधील सर्व खडी कोसळली. यामुळे खडीखालीच तो गाडला गेला व जागीच ठार झाला.

टिप्परची धडक इतकी जोराची होती की ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडतात मोठा आवाज आला, यामुळे येथून रहदारी करणारे नागरिक घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी दाखल होतात नागरिकांना ट्रॅक्टर चालकाचा पत्ताच लागला नाही, परंतु थोड्या उशिरानंतर संतोष हा खडीमध्ये गाडला गेला याची जाणीव होताच,आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले परंतु तो जागीच गतप्राण झाला होता. Tractar accident

सकाळी हा अपघात घडल्यामुळे ही घटना हलगा गावात वाऱ्यासारखी पसरली, यामुळे हलगा येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतोष हा उमदा तरुण ठार झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदयाला द्रावक होता. त्याच्या पश्चात आजोबा, आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.Santosh huded

उमद्या वयातच संतोष वर काळाचा घाला पडल्यामुळे अनेक जण हळहळ व्यक्त करत होते. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.