Friday, March 29, 2024

/

‘उदे ग आई’च्या गजराने दुमदुमला सौंदत्ती डोंगर

 belgaum

‘कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा आज शुक्रवारी साजरी झाली असून शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर हजर झाले आहेत.

आज शुक्रवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक,पूजा चर्चा करण्यात करून त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोना महामारीमुळे सलग 2 वर्षे सौंदत्ती डोंगरावर देवीची शाकंभरी पोर्णिमा यात्रा भाविकांना साजरी करता आली नाही.

मात्र यावर्षी यात्रेदरम्यान देवीचे दरवाजे खुले असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भावीक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाले आहेत. उद ग आई, उद च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमून गेला आहे. भंडाऱ्याची मुक्त उधळन केली जात आहे. एकंदर भाविकांच्या उदंड उत्साहात सौंदत्ती श्री रेणुका देवीची शाकंभरी यात्रा यंदा मोठा भव्य प्रमाणात साजरी होत आहे. यावर्षी यात्रेसाठी प्रत्येक गावातून प्रमाणहून अधिक भाविकांसह, खासगी वाहने, परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रॅक्टर, बैलगाड्या इतर खासगी वाहने डोंगरावर आली आहेत.Soundatti

 belgaum

त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रचंड संख्येने आलेले भाविक पाहता आवश्यक सुविधाही अपुरे पडलेल्या दिसून येत आहेत.

देवी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभाव परिसरातही पवित्र स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.