Monday, April 29, 2024

/

शहरातील श्री रेणुका देवी मंदिरासाठी सढळ हस्ते देणगी

 belgaum

जिर्णोद्धार केल्या जात असलेल्या जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी 1.25 लाख रुपयांची देणगी देऊ केली आहे.

जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी हातभार लावताना मंदिराच्या दरवाजासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांनी सढळ हस्ते 1 लाख 25 हजार रुपयांची देणगी देऊ केली.

याप्रसंगी कडोलकर कुटुंबीय व हितचिंतक उपस्थित होते. संजय कडोलकर यांच्या व्यतिरिक्त रघुनंदन कदम यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी 50 हजार रुपयाची देणगी दिली. याबद्दल या दोघांचा श्री रेणुका देवी देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला.Renuka mandir

 belgaum

याप्रसंगी राहुल मुचंडी चंद्रकांत कामुले, बाळू लोहार, विनोद पुजारी, यल्लाप्पा पाटील आधी उपस्थित होते. जुन्या पी. बी. रोड येथील श्री रेणुका देवी मंदिराचा सध्या मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला जात आहे.

तरी दानशूर व्यक्ती आणि भाविकांनी या जिर्णोद्धार कामास आपल्यापरीने हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.