Friday, September 13, 2024

/

बेळगाव मध्ये पुन्हा हिवसाळा! तालुक्यातील ‘या’ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ऐन थंडीच्या मौसमात तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अनुभवणाऱ्या बेळगावकरांना जानेवारी महिन्यातही पावसाचा अनुभव मिळाला आहे. मच्छे, हलगा, येळ्ळूर आदी भागात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा झाली. आज दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकच तारांबळ उडाली.

अलीकडे वातावरणात सातत्याने बदल होत आहेत, याचा प्रत्यय गेल्या वर्षभरात सातत्याने येत आहे. उन्हाळ्यात थंडी हिवाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात कडक ऊन! अशा प्रकारच्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप पावसाने पाठ सोडली नाही.

डिसेंबर महिन्यात बेळगाव मधील थंडी वाढते. मात्र, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील अपवाद वगळता ढगाळ वातावरण आणि कडक ऊन असे वातावरण नागरिक अनुभवत आहेत. आता तर चक्क हलगा, मच्छे, येळ्ळूर या भागात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला.Rainfall cloudy

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, अचानक उष्ण वातावरण सुरू झाले आणि गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे वातावरणच बिघडल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम आटपला आहे. मात्र, मसूर वाटाणा, हरभरा यासारख्या रब्बी हंगामातील पिक सध्या बहरात आले आहे. आज अचानकपणे पडलेल्या पावसाने या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहरात सकाळी ऊन दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे बेळगाव मध्ये हिवसाळ वातावरण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शिवाय नागरिकांमध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे अचंबाही व्यक्त होत आहे.

वातावरणामध्ये सातत्याने होत असणारे हे बदल जनजीवन विस्कळीत करत आहेत. शिवाय नागरिकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावकर ढगाळ वातावरण अनुभवत आहेत.

मात्र, आज ४ च्या दरम्यान पडलेल्या पावसामुळे अनेकांची त्रिधा तिरपीट मात्र उडाली. पावसाच्या मोठ्या सरीमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना निवारा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. तसेच वर्दळ थांबून गावातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पहावयास मिळाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.