Thursday, January 23, 2025

/

नियमबाह्य गतिरोधकांमुळे वाहनचालकांची जीवघेणी कसरत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अपघात टाळण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्त्यावर गतीरोधक निर्माण केले जातात. मात्र अलीकडे अनेक अपघात हे अतिरोधकांमुळेच होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

गतीरोधक निर्मितीच्या काही शास्त्रोक्त पद्धती आहेत. नियम आहेत. मार्गदर्शक तत्वे आहेत. परंतु बेळगावमध्ये अनेक रस्त्यावर निर्माण करण्यात आलेले गतीरोधक नियमबाह्य असल्याचे आढळून आले आहे.

एकाच रस्त्यावर दोन गतीरोधक उभारताना किंवा गतिरोधकांच्या उंचीबाबत इंडियन रोड सायन्सचे निकष ठरवले गेले आहेत. गतीरोधक उभारल्यावर त्यावर थर्मि प्लास्टिक पेंट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतीरोधक येण्या आधी ४० मीटर अंतरावर सूचना फलक रस्त्यावर असणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक नसावेत असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतीरोधक आवश्यक असल्याने राबलिंग पद्धतीचे गतीरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतीरोधक उभारताना गतिरोधकांची उंची अडीच ते दहा सेंटिमीटरपर्यंत आणि ३.६ सेंटीमीटर, वर्तुळाकार क्षेत्र १७ मीटर असायला हवे.

एखाद्या वाहनावर वेग मर्यादा न ठेवता मार्गक्रमण केल्यास अपघात होण्याची शक्यता असते. या अपघातात जीवित आणि वित्त हानीही होते. याच अपघातांना रोखण्यासाठी गतिरोधकांची निर्मिती केलेली असते. मात्र गतिरोधकांच्या निकषांना डावलून बेळगावमध्ये अनेकठिकाणी गतीरोधक उभारण्यात आले आहेत.Speed brekers

गतिरोधकांचे शास्त्रोक्त नियम पाळण्यात न आल्याने अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या मागणीचा विचार करून लोकप्रतिनिधी नियमबाह्य गतिरोधकांची उभारणी करतात. यामुळे वेगाला ब्रेक लागण्याऐवजी अपघाताला आमंत्रण मिळत आहे. अपघात रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेले गतीरोधक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. यामुळे आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना मान, पाठ, मणक्याचे गंभीर आजार होत चालले आहेत. मात्र प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

बेळगावमध्ये अलीकडे अनेक अपघात गतिरोधकामुळे झाले आहेत. चुकीच्या आणि बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेल्या गतिरोधकमुळे वाहने खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्यासह वाहनाच्या दुरुस्तीचा भुर्दंडही नागरिकांना सोसावा लागत आहे. यामुळे संबंधित विभागाने शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधकांची निर्मिती करून नागरिकांचे जगणे सुसह्य करावे, अशी मागणी वाढत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.