Tuesday, May 21, 2024

/

एन. सतीश कुमार बेळगाव उत्तरचे नवे पोलीस महानिरीक्षक

 belgaum

कर्नाटक राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबरोबरच राज्य शासनाने आता अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. त्यानुसार एन. सतीश कुमार यांची कलबुर्गी ईशान्य विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदी बदली होती मात्र नवीन आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत ते बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक देखील असणार आहेत.

नव्या आदेशानुसार हुबळी -धारवाड शहराचे पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्त लाभू राम यांची बढती पर गुप्तचर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी तात्काळ बदली झाली आहे.

हे पद नियोजन आणि आधुनिकीकरण बेंगलोर मुख्य कार्यालयाच्या पोलीस महानिरीक्षक पदाच्या दर्जाचे असणार आहे. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक रमण गुप्ता यांची पुढील आदेशापर्यंत तडकाफडकी बदली झाली आहे तर  लाभू राम यांच्या जागी हुबळी -धारवाड शहराचे पोलीस आयुक्त व उपपोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

 belgaum

कर्नाटक पोलीस अकॅडमी म्हैसूरचे उपपोलीस महानिरीक्षक व संचालक अनुपम अगरवाल यांची कलबुर्गी ईशान्य विभाग पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. हे पद अंतर्गत सुरक्षा उपपोलीस महानिरीक्षक पदाच्या दर्जाचे आणि जबाबदारीचे असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.