Friday, March 29, 2024

/

कोल्हापूरच्या’जुन्या सरदार्स’नी लावली सरदार मैदानावर हजेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील सरदार्स मैदान हे क्रिकेट या खेळासाठी सुप्रसिद्ध आहे. या मैदानावर केवळ बेळगाव मधीलच नाही तर बेळगाव सह विविध जिल्ह्यातील आणि विविध राज्यातील खेळाडूंनी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक रणजी क्रिकेटपटूंनी देखील सरदार मैदानावर क्रिकेट सामने खेळले असून आजही त्या क्रिकेट सामन्यांबद्दलची आठवण अनेक क्रिकेटपटू आवर्जून सांगतात.

सध्या याच मैदानावर आमदार अनिल बेनके आयोजित नॅशनल लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच सरदार मैदान गर्दीने खचाखच भरले आहे. या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी याच मैदानावर क्रिकेट सामने गाजवलेले माजी क्रिकेटपटू उपस्थित राहून सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. याचप्रमाणे पूर्वी झालेल्या सामन्यांच्या अनेक आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आहे. आम. अनिल बेनके आयोजित बेळगावच्या सरदार्स मैदानावरील क्रिकेट स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे.

क्रिकेट स्पर्धेची आवड बघून केवळ बेळगावच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी देखील येत आहेत. माजी क्रिकेट स्पर्धकांनाही या क्रिकेट स्पर्धेची भुरळ पडली आहे. गेल्या ३० वर्षात अनेक खेळाडूंनी क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. माजी आमदार रमेश कुडची आयोजित रेणुका चषक स्पर्धेत मैदान गाजविणारे कोल्हापूर मधील दिलीप पाटील आणि शशांक खांडेकर यांनी आज सरदार्स वर सुरु असलेल्या सामन्यांसाठी हजेरी लावली.Sardar ground

 belgaum

यावेळी बेळगावमध्ये ३० वर्षांपूर्वी झालेल्या क्रिकेट सामन्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ३० वर्षांपूर्वीच्या खेळात आणि सध्याच्या खेळात बरेच बदल झाले आहेत मात्र बेळगावकांचे क्रिकेटप्रेमी मात्र आजही तसेच असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. आम. अनिल बेनके यांनी क्रिकेट स्पर्धेसाठी केलेले सुयोग्य नियोजन याबाबत देखील त्यांनी विशेष कौतुक करत बेळगावकरांनी ३० वषांपूर्वी कोल्हापूर टीम साठी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आवर्जून कौतुक केले. केवळ मैदानच नव्हे तर मैदानाबाहेरील रस्त्यावर देखील क्रिकेटप्रेमींची उपस्थिती पाहून क्रिकेट खेळण्यासाठी उत्साह निर्माण व्हायचा. बेळगावकरांनी दिलेली दाद हि कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासारखी असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.

याचप्रमाणे शशांक खांडेकर यांनीही बेळगावमधील क्रिकेट सामन्यांचे कौतुक करत पूर्वी भरणाऱ्या क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आजही नागरिक तितक्याच आवडीने गर्दी करत असल्याचे ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी आयोजिण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात गर्दीने भरलेल्या मैदानावरील प्रेक्षक गॅलरी कोसळली होती.

त्यावेळी क्रिकेट प्रेमींचा उत्साहही भारावलेला होता. आणि आजही या मैदानावरील क्रिकेट सामन्यांसाठी झालेली गर्दी हि क्रिकेट वरील प्रेम दर्शविते असे ते म्हणाले. सरदार्स वर अनिल बेनके यांनी आयोजिलेल्या स्पर्धेचे नीटनेटके नियोजन आणि प्रामुख्याने प्रेक्षकांसाठी करण्यात आलेली सोय हि उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.