अनेक राजकारणी निवडणूक नजरेसमोर ठेवून आश्वासनांची खैरात करत असल्याची उदाहरणे आपण अनेकवेळा पहिली आहेत. मात्र राजकारण बाजूला ठेवून केवळ समाजकारण आणि आपल्या जबाबदारीची जाणीव असलेले क्वचितच पाहायला मिळतात.
कोल्हापूर येथे समिती नेतृत्वाखाली झालेल्या ‘चलो कोल्हापूर’ आंदोलनादरम्यान बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी या गावातील मयूर भास्कर या कार्यकर्त्याची दुचाकी चोरीला गेली.
याबाबतचे वृत्त ‘बेळगाव लाईव्ह’ वर प्रकाशित झाले होते. सदर वृत्त प्रत्येकाच्या कानावर गेले. यावेळी या तरुणावर ओढवलेल्या संकटात आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांनी धीर देत सदर दुचाकी शोधण्याचे आश्वासन दिले. चोरीला गेलेली दुचाकी सापडली नाही तर आपण स्वतः दुसऱ्या दुचाकीची व्यवस्था करून देईन, असा शब्द दिला होता.
दुचाकी चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यानंतरदेखील कोणता सुगावा न लागल्याने आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील युवकांचे आधारस्तंभ असलेले चेतन पाटील यांनी सदर युवकाला दुसरी दुचाकी स्वखर्चाने घेऊन दिली आहे.
चेतन पाटील यांनी कार्यकर्त्याप्रती दाखविलेला हा दिलदार पणा एखाद्या राजकारण्यालादेखील लाजवणारा असा आहे. तालुका समिती युवा आघाडीचा घटक असलेल्या चेतन यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक आज सीमाभागात मोठ्या प्रमाणात होत आहे.
दुचाकी हरवलेली बातमी देखील बेळगाव live ने प्रसिद्ध केली होती. त्याचे लिंक