Friday, December 27, 2024

/

बुडा मधील त्या घोटाळ्याची चौकशी : मंत्री कारजोळ

 belgaum

बेळगाव नगरविकास प्राधिकरणात (बुडा) झालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या भूखंड वाटप घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती  जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन समारंभात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री कारजोळ यांनी ही माहिती दिली.मागील काही दिवसापूर्वी आप नेते राजीव टोपन्नवर यांनी सदर भूखंड घोटाळा पर्दाफाश करत कारवाईची मागणी केली होती.

बुडाकडून एकदा ऑनलाईन पद्धतीने अन एकदा ऑफलाईन पद्धतीने भूखंडांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात दीडशे कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाला आहे. त्याबाबत माहिती विचारली असता, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपला त्याचाशी संबंध नाही असे म्हटल्याचे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर प्रतिक्रिया देताना कारजोळ म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांना कदाचित त्याबाबत माहिती नसावी. त्यांनी ती घेऊन देणे आवश्यक आहे. याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल.

बुडामध्ये जो कथित घोटाळा झालाय त्याची नगरविकास खात्याच्या बेंगळूर येथील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकरवी चौकशी करण्यात येईल. यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. Govind karjol

खानापूर आमदारांनी लग्नाच्या पत्रिके सारखी  त्या उद्घाटनाची पत्रिका छापली

खानापूर तालुक्यातील आमटे गावातील राणी चन्नम्मा निवासी कन्या शाळेचा उदघाटन समारंभ निमंत्रण पत्रिका छापून, वाटून देखील रद्द करण्यात आला, हे भाजपचे खालच्या स्तरावरचे राजकारण आहे असा आरोप आ. अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कारजोळ म्हणाले, कोणत्याही कार्यक्रमाचा एक शिष्टाचार असतो. संबंधित मंत्र्यांची वेळ ठरवून, मंजुरी घेऊन कार्यक्रम करावा लागतो. त्यांना वेळ नसेल तर जिल्हा पालकमंत्र्यांची वेळ घेऊन कार्यक्रम घेतला जातो.

शिष्टाचार अधिकारी म्हणून त्याची माहिती किमान जिल्हाधिकाऱ्यांना तरी असली पाहिजे. या बाबतीत हे मला व अन्य कोणालाही माहित नाही. आमदारांनीच कुठे तरी लग्नाचे निमंत्रण दिल्यासारखे पत्रिका छापून स्वतःच कार्यक्रम जाहीर केला तर कसे? असा प्रश्न त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.