belgaum

बेळगाव लाईव्ह : पाश्‍चिमात्य देशांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण किडनीचा त्रास, मधुमेह, कर्करोग आदी आजारांनी त्रस्त आहोत. त्यामुळे तृणधान्ये आणि सेंद्रिय घरगुती अन्नाचे सेवन करून आरोग्याचे रक्षण करण्याचे आवाहन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.

bg

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग आणि कृषी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर आयोजित दोन दिवसीय धान्य व सेंद्रिय मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

पूर्वीच्या काळी लोक कोणतीही कीटकनाशके आणि रासायनिक खते न वापरता सर्व पिके घेत असत. त्यामुळे त्या काळातील लोक निरोगी होते. पण अलीकडे चालीरीती, देशी खाद्य प्रथा सोडून आपणही परकीयांच्या चालीरीतींचे अनुकरण करत आहोत आणि अनेक आजारांनी ग्रासत आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी स्वदेशी औषध पद्धतीला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आपले पूर्वज स्वतः पिकविलेले अन्नधान्य खात असत. पण अलीकडच्या काळात आपण पिकवलेली पिके विकून पिझ्झा, बर्गर खाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी जागरूक होऊन आपल्या पूर्वजांच्या आहाराचे अनुकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तृणधान्ये आणि सेंद्रिय पिके घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला.Karjol

यावेळी प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितीश के. पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, बेळगाव कृषी संस्थेचे जिल्हाध्यक्ष टी.एस. मोरे, कृषी समाजाचे बेंगळुरू येथील विभागीय कार्यकारी सदस्य नारायण च. कलाल, कृषी सहसंचालक, शिवनगौडा पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर 26 आणि 27 जानेवारी असे दोन दिवस तृणधान्य आणि सेंद्रिय मेळा होणार आहे. विविध प्रकारची तृणधान्ये आणि सेंद्रिय अन्नधान्यांचे प्रदर्शन व विक्रीही या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.