महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादा वर बुधवार ११ रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या दिवशी अंतरिम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे या संदर्भात तशी महाराष्ट्राकडून विनंती होणार आहे.
गेल्या महिन्यात बेळगाव प्रश्नावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातच गेल्या महिन्यात सीमाप्रश्र्नी सुनावणी होणार होती. मात्र तीन सदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्शती दुसर्या खटल्यात व्यस्त असल्यामुळे सुनावणी होऊ शकली नव्हती.
मात्र सुनावणी लवकर व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर न्यायालयाला नाताळाची सुट्टी असल्याने सुनावणीसाठी तारीख आली नव्हती. मात्र 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहणार आहे.
महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती यावी यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून सातत्याने चालढकल सूरू असून कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सीमाप्रश्नाची सुनावणी झाली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या वकीलानी तयारीसाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे सुनावणी लांबणीवर टाकावी अशी विनंती केली होती. मात्र लवकर सुनावणी व्हावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्या नंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ राकेश द्विवेदी व वैद्यनाथन हे बाजू मांडणार आहेत.