बेकायदेशीररित्या खोदाई करून खनिज काढून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 8 जणांचा अटकपूर्व जामीन चौथ्या अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
रामचंद्र पाटील (वय 61), विजय पाटील (वय 50), कलाप्पा पाटील (वय 36), पार्वती पाटील (वय 74), भरमाना पाटील (वय 77), खाचू अष्टेकर (वय 72), चिमान्ना अष्टेकर (वय 66, सर्व रा. बिजगर्णी) आणि विठाबाई गावडे (वय 60, रा. कानुर खुर्द ता. चंदगड) अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.
बिजगर्णी येथील सर्व्हे क्र. 248 /2 मधील 3 एकर दोन गुंठे शेतजमिनीत विनापरवाना खोदाई करून 600 मॅट्रिक खनिज विक्री करण्याव्दारे सरकारचे प्रति टन 1000 रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. त्यानंतर या सर्वांवर एमएमडीआर ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चौथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता.
त्या ठिकाणी सुनावणी होऊन संबंधित सर्वांना 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार, 15 दिवसाच्या आत दुसऱ्या जीएमएफसी न्यायालयात हजर व्हावे, साक्षीदारांना धमकाऊ नये व परत असा गुन्हा करू नये अशा अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे काम पाहत आहेत.