Friday, March 29, 2024

/

प्रतिस्पर्ध्यांना नमून मोहन मोरे, रामराज इलेव्हन विजयी

 belgaum

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून मोहन मोरे इलेव्हन व रामराज इलेव्हन या संघांनी विजय नोंदवत पुढली फेरी गाठली.

सरदार्स हायस्कूल मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात डेपो मास्टर्स संघाने प्रतिस्पर्धी पोलीस इलेव्हन संघाला 18 धावांनी पराजित केले. प्रथम फलंदाजी करताना डेपो मास्टर्स संघाने मर्यादित 10 षटकात सर्व गडी बाद 100 धावा काढल्या. प्रत्युत्तरा दाखल पोलीस इलेव्हन संघाला 9.4 षटकात सर्व गडी बाद 82 धावा काढता आल्या. विजेत्या डेपो मास्टर्स संघातर्फे पार्थ पाटील (28 धावा), अमित बागडे (14 धावा), सुमित रेडेकर (13 धावा) व अक्षय डी. (नाबाद 12 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.

या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार डेपो मास्टर्स संघाच्या पार्थ पाटील याने पटकावला. दुसऱ्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी अयोध्या कडोली संघावर 43 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना मोरे इलेव्हन संघाने मर्यादित 10 षटकात 6 बाद 115 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल अयोध्या कडोली संघाला सर्व 10 षटके खेळूनही 6 गडी बाद 72 धावा काढता आल्या. विजेत्या मोहन मोरे इलेव्हन संघातर्फे करण मोरे (55 धावा), मंगेश व्ही. (27 धावा) व धीरज भोईटे (17 धावा) यांनी उत्तम फलंदाजी केली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी मोरे संघाचा करण मोरे हा ठरला.

 belgaum

तिसऱ्या सामन्यात रामराज इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी एमपी बॉईज धोबीघाट संघावर 5 चेंडू व 6 गडी राखून शानदार विजय मिळविला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमपी बॉईज संघाने 8 षटकात 7 गडी बाद 72 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल रामराज इलेव्हन संघाने 7.1 षटकात 4 बाद 76 धावा काढून सामना जिंकला. विजेत्या रामराज संघातर्फे देवराज मिटक (नाबाद 48 धावा) व अवधूत पाटील (नाबाद 12 धावा) यांनी शैलीदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.Cricket benke

या सामन्याचा ‘सामनावीर’ पुरस्कार रामराज संघाच्या देवराज मिटक यांनी हस्तगत केला. आजच्या पहिल्या दोन सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी डेपो मास्टर्स संघावर 7 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना डेपो मास्टर्स संघाने 8 षटकार 4 गडी बाद 58 धावा काढल्या. हे आव्हान यशस्वीरित्या झेलताना मोहन मोरे इलेव्हन संघाने 4 षटकात 3 गडी बाद 60 धावा झळकविल्या. त्यांच्या आकाश जनगिड (नाबाद 24 धावा), अंकित राऊत (नाबाद 14 धावा) व मंगेश व्ही. (14 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार मोरे संघाच्या अंकित राऊत याला प्रदान करण्यात आला.

आमदार अनिल बेनके करंडक अ. भा. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. आता उद्यापासून या स्पर्धेत जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मुंबई, कोलकता आदी ठिकाणचे संघ सहभागी होणार असल्यामुळे स्पर्धेची रंगत व चुरस अधिकच वाढणार आहे.

उद्या रविवार दि 15 जानेवारी रोजी पुढील प्रमाणे सामने होणार आहेत. 1) झियान स्पोर्ट्स वि. फौजी इलेव्हन (सकाळी 9 वा.), 2) स्टार युपी वि. नवाराज इलेव्हन जम्मू-काश्मीर (सकाळी 11 वा.), 3) जीजी बॉईज वि. एवायएम बी अनगोळ (दुपारी 1 वा.), 4) एसआरएस हिंदुस्तान वि. मोहन मोरे इलेव्हन (दुपारी 3 वा.).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.