आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या मंगळवारी एका आदेशाद्वारे बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 13 मार्च 2008 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त केले आहेत. त्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी आणखी एक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त केला आहे. मतदार नोंदणीचे काम अधिक सुलभ होण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य सरकार तसेच राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करून या नियुक्त्या केल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये होणार असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करणे, याद्यांची पडताळणी हे काम सुरू आहे.
बंगळूर येथे मतदार यादी घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर निवडणूक आयोगही सतर्क झाला आहे. अन्य मतदार संघात त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काटेकोर पडताळणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मतदार संघासाठी नियुक्त केलेले अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.
बेळगाव उत्तर : बाल विकास अधिकारी बेळगाव शहर, बेळगाव दक्षिण : बाल विकास अधिकारी बेळगाव ग्रामीण, बेळगाव ग्रामीण : कार्यकारी अधिकारी बेळगाव तालुका पंचायत, खानापूर : कार्यकारी अधिकारी खानापूर तालुका पंचायत, यमकणमर्डी : बालविकास अधिकारी हुक्केरी, निपाणी : कार्यकारी अधिकारी निपाणी तालुका पंचायत, चिक्कोडी-सदलगा : कार्यकारी अधिकारी चिक्कोडी तालुका पंचायत,
अथणी : कार्यकारी अधिकारी कागवाड तालुका पंचायत, कुडची : सहाय्यक कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग रायबाग, रायबाग : बाल विकास अधिकारी रायबाग, हुक्केरी : कार्यकारी अधिकारी हुक्केरी तालुका पंचायत, अरभावी : कार्यकारी अधिकारी मुडलगी तालुका पंचायत, गोकाक : कार्यकारी अधिकारी गोकाक तालुका पंचायत, कित्तूर : कार्यकारी अधिकारी कित्तूर तालुका पंचायत, बैलहोंगल : कार्यकारी अधिकारी बैलहोंगल तालुका पंचायत, सौंदत्ती : कार्यकारी अधिकारी सौंदत्ती तालुका पंचायत, रामदुर्ग : कार्यकारी अधिकारी रामदुर्ग तालुका पंचायत.