कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी आज सकाळी हलगा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सध्या कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त सध्या बेळगावआत वास्तव्य असलेले कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी आज मंगळवारी सकाळी हलगा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली.
ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बेळगोजी आणि उपाध्यक्ष सुजाता सुतार यांनी सभापती कागेरी यांचे सहर्ष स्वागत केले. तसेच त्यांच्यासमोर सध्या गावाला प्रकर्षाने भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली.
त्यावर बोलताना सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी सुवर्ण विधानसौधसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून हलगा गावासाठी दोन इंची पाईपलाईन घालून गावकऱ्यांच्या पाण्याची सोय केली जाईल. त्याकरता मी विधानसभेत मुद्दा मांडेन, असे ठोस आश्वासन दिले.
आजच्या या सदिच्छा भेटीप्रसंगी हलगा ग्रामपंचायत आणि गावातर्फे अध्यक्ष सदानंद बेळगोजी यांनी सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य सागर कामनाचे, पिराजी जाधव, तवन्यास पायका, विलास परीट आदींसह पीडिओ, सेक्रेटरी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
हालगा ग्रामस्थांनीच सुवर्ण सौधचे निर्माण करण्यासाठी जमीन दिली होती त्या मोबदल्यात हलगा ग्रामपंचायतीच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ते अद्याप कोणतेच ग्राम पंचायतीचे मोठे काम शासनाने केले नाही उलट पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे यासाठी अधिवेशना दरम्यान ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत होते मात्र आता थेट स्पीकर हेगडे कागेरी यांनी ग्रामपंचायतीला भेट देण्यात दिल्याने पिण्याची पाण्याची समस्या तरी सुटेल अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.