बेळगाव लाईव्ह : मालवाहू टिपरने शाळकरी मुलाला दिलेल्या धडकेत बारा वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना भाग्यनगर दहाव्या क्रॉसजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.
सदर शाळकरी विद्यार्थी सायकली वरून आपल्या घराकडे जात असताना टिप्परने दिलेल्या धडकेत त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. प्रदीप शिंदे वय १२ रा. रोहिदास कॉलनी चौथा रेल्वे गेट अनगोळ बेळगाव असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो शानभाग शाळेत शिकत होता.
भाग्यनगर अनगोळ रोडवर हा अपघात झाला असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
बेळगाव शहरात अधिवेशनाच्या पूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे जोरदार सुरू आहेत त्यासाठी अनेक टिप्पर मालवाहू गाड्यांची वर्दळ सुरू आहे. याचदरम्यान हा रस्ते अपघात घडल्याची चर्चा सुरु आहे.
शुक्रवारी सायंकाळी भाग्यनगर मध्ये झालेल्या अपघातामुळे शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रहदारी दक्षिण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.