Sunday, December 22, 2024

/

3 ऐवजी 6 रोजी समन्वयक मंत्री बेळगावात

 belgaum

महाराष्ट्राच्या सीमाभाग समन्वयक चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याच्या कार्यक्रमात थोडा बदल केला असून हे उभय मंत्री शनिवारी 3 डिसेंबर ऐवजी मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी बेळगाव भेटीला येणार आहेत.

सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून आज गुरुवारी दुपारी ही माहिती दिली आहे. 6 डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना येण्याचा बेळगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचा आग्रह आहे.

त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आमचा 3 डिसेंबरचा बेळगाव प्रवास 6 डिसेंबरला करणार आहोत, असे ट्विट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

लवकरच सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या दौऱ्याचा तपशील कार्यक्रम जाहीर होणार आहे आणि सहा  डिसेंबर रोजी चंद्रकांत पाटील कोणकोणत्या ठिकाणी भेटी देणारा त्याचीही माहिती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.