महाराष्ट्र विधिमंडळाने सीमाप्रश्नी केलेल्या ठरावाचा निषेध करून महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न केव्हाच निकालात निघाला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाजन आयोगाच्या अहवालानुसार सीमाप्रश्न फार पूर्वीच निकालात निघाला आहे.
महाराष्ट्र सरकार सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याच्या मागणीचा ठराव करत असले तरी त्याला कायदेशीर वैधता नाही. आमच्या विधानसभेत आम्ही निर्णय घेतला आहे असे सांगून महाराष्ट्र विधानसभेतील ठरावाला कवडीची किंमत नाही, अशी दर्पोक्ती सिद्धरामय्या यांनी केली.