स्वीमर्स क्लब आणि ॲक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा होतकरू जलतरणपटू अमन सूणगार याने नुकत्याच झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह एकूण 5 पदकांची कमाई करत अभिनंदन यश संपादन केले आहे. त्यामुळे आता त्याची दक्षिण विभागीय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी अभिनंदन आणि निवड झाली आहे.
मंड्या तेथील पीईटी ॲक्वेटिक सेंटर येथे गेल्या 6 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये 21 वी राज्यस्तरीय शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील 50 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. बॅकस्ट्रोक आणि 200 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये बेळगावच्या अमन सूणगार याने सुवर्णपदक पटकाविले.
त्याचप्रमाणे 50 मी. बटरफ्लाय आणि 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले या शर्यतींमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळविले आहे. सदर कामगिरीमुळे अमन सूणगार याची येत्या 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत तिरुवनंथपुरम, केरळ येथे होणाऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अमन हा शहरातील प्रतिष्ठित नागरिक अभिजीत सूणगार आणि वसुंधरा सूणगार यांचा मुलगा असून तो सेंटपॉल हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
शहरातील सुवर्णजीएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याच्या सराव करणाऱ्या अमन याला जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
उपरोक्त यशाबद्दल केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, रो. अविनाश पोतदार, जयभारत फाउंडेशनचे जयंत हुंबरवाडी, लता कित्तूर, माणिक कपाडिया, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडुलकर यांनी अमन सूणगार याचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.