Friday, April 26, 2024

/

सतीश जारकीहोळींच्या बदनामीचे षडयंत्र : कडोली मराठा समाज पत्रकार परिषद

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विकासाच्या मुद्द्यावर आमदार सतीश जारकीहोळी यांना कुणीही मागे टाकू शकत नाही, हे सर्वश्रुत असल्याने त्यांना वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप कोडोली येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दर्शविला.

बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजाने आरक्षणप्रश्नी छेडलेल्या आंदोलनादरम्यान आमदार सतीश जारकीहोळी यांचे भाषण सुरु असताना जाणीवपूर्वक व्यत्यय आणून त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले. मात्र सतीश जारकीहोळी यांच्या पाठीशी यमनकनमर्डी मतदार संघातील जनता ठामपणे उभी आहे, असा कडक इशारा यमकानमर्डी मतदार संघातील मराठा समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

विधानसभा निवडणूक काही महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपल्याने आमदार सतीश जारकीहोळी यांना टार्गेट करण्याचे कारस्थान विरोधकांकडून सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यमकनमर्डी विधानसभा मतदार संघावर सातत्याने निवडून येऊन आपला ठसा उमटवणाऱ्या सतीश जारकीहोळी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. सतीश जारकीहोळी यांनी आजवर आपल्या मतदार संघाचा विकास उत्तमरीत्या केला आहे.Arun katambale

 belgaum

विकासाच्या बाबतीत त्यांना कुणीच मागे टाकू शकणार नाही, हि बाब विरोधकांना माहित असल्याने त्यांनी हे षडयंत्र रचले. यामध्ये भाजपचा मोठा हात असून जाणीवपूर्वक आंदोलनादरम्यान भाषणात व्यत्यय आणण्यात आला. त्यांना बदनाम करून राजकीय स्वार्थ साधण्यात येत असून सातत्याने सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत असून त्यांच्या पाठीशी मराठा समाजातील सर्व नेते ठामपणे उभे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला यमकनमर्डी मतदार संघातील माजी ए  पी एम सी अध्यक्ष आनंद पाटील,मनोहर हुक्केरीकर,संदीप जक्काने,भाऊ गडकरी आदी मराठा समाजतील नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.