बेळगाव शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असताना कणबर्गी येथे बसवण्यासाठी आणलेल्या पाईपला चुकून आग लागली आणि पाईप जळून खाक झाले आहेत.
बेळगाव येथील ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गीजवळ पहाटे तीन वाजता ही घटना घडली होती.या घटनेत तीसहून अधिक पीयूसी पाईप आगीत भस्म झाले आहेत.
एल अँड टी कंपनीने कणबर्गी येथे कामासाठी पाईप्सचा साठा केला होता.पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चुकून आग लागली व पाईपने पेट घेतला.
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.कोणतीही मोठी घटना घडली नाही. आजूबाजूला घरे नसल्याने हा अपघात टळला पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.