बेळगाव सुवर्ण विधानसभेतील हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांबाबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा आणि अनास्था बुधवारी स्पष्टपणे उघड दिसून आली.
विधानसभेतील 224 आमदारांपैकी फक्त 30 आमदारांनी उत्तर कर्नाटकातील समस्या संबंधी चर्चेत भाग घेतला होता.
यामध्ये प्रामुख्याने आमदार ए. एस. पाटील -नडहळ्ळी यांनी उत्तर कर्नाटकातील समस्या सभागृहात मांडल्या. आमदार नडहळ्ळी यांनी उत्तर कर्नाटकातील 14 लाख हेक्टर जमीन जलसिंचना खाली आणणाऱ्या अप्पर कृष्णा प्रकल्प (युकेपी) टप्पा -3 ची अंमलबजावणी करण्याबरोबरच या संपूर्ण प्रदेशाचा व्यापक विकास करण्याची मागणी केली.
सरकारने कायदेशीर समस्या निकालातकडून हा महत्त्वाचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, असे ते म्हणाले.