Saturday, January 11, 2025

/

अमित शहा करणार कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 belgaum

महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यावर चर्चा केली.

बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादा संदर्भात सध्या सुरू असलेल्या घडामोडी बाबत या शिष्टमंडळाने अमित शहा यांच्याशी कर्नाटकाच्या अडेलतट्टू भूमिकेवर चर्चा केली योग्य समन्वयाने मार्ग काढा अशी मागणी केली

बेळगावच्या विषयावर आगामी १४ डिसेंबरला अमित शहा कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहेत अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या बैठकी नंतर माध्यमांना दिली.

शिवाजी महाराजांबद्दल वारंवार अवमान जनक वक्तव्य केले जातेय यासाठी संसदेनं ठोस कायदा आणावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकसभेत या विषयावर दुर्देवानं बोलण्याची संधी मिळाली नाही मी लोकसभा अध्यक्षांकडे हा मुद्दा मांडला आहे.Amit shah bo

शिवाजी महाराजांवर कलाकृती आली पाहीजे पण इतिहास मांडताना काळजी घ्यायला पाहिजे या वादाच्या मुद्द्याला आळा घालायला पाहिजे.सिनेमॅटिक लिबर्टी ही मनोरंजना असावी पण इतिहासाची चर्चा होऊ नये
इतिहासाची जाण आणि भान नसेल तर जनता करून देईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल सर्व खासदारांनी एकत्रित आवाज उचलणे गरजेचं होतं पण ते झालं नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

केंद्रीय गृहमंत्री सीमा प्रश्नी नक्कीच मार्ग काढतील, खास.सुप्रिया सुळे यांची माहिती

नवी दिल्ली –गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा वरून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, सीमा प्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा वादा संदर्भात चालविलेल्या बेताल वक्तव्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचाराची ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाप्रश्नी आमच्याकडून सविस्तरपणे सर्व माहिती घेतली. त्यामुळे अमित शहा सीमा प्रश्नी योग्य तो मार्ग काढतील अशी आशा आहे. मात्र महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार सीमा प्रश्नी मवाळ भूमिका घेत आहे. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.