Saturday, January 11, 2025

/

कर्नाटकी प्रशासनाचा उद्दामपणा; निवेदन देणारे समिती नेते ताब्यात

 belgaum

महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कर्नाटकी प्रशासनाचा आदमुठेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याचे कारण पुढे करत, नेहमीसारखी आडमुठी भूमिका पोलिसांनी घेतली असून या पार्श्वभूमीवर सर्व नेते मंडळींना ताब्यात घेण्यात आले आहे.

144 कलम झाल्याचे निमित्त पुढे करून पुन्हा एकदा बेळगाव पोलिसांनी मराठी भाषिकांवर दडपशाही केली आहे.Mes arrest

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून समितीच्या जवळपास 40 हुन अधिक नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात हजर केले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर , माजी आमदार दिगंबर पाटील, युवा नेते आर. एन. चौगुले, आर . आय. पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, श्री राम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर,माजी महापौर शिवाजी सुंठकर,  पाटील, शिवाजी मंडोळकर, ऍडव्होकेट एम जे पाटील, मोतेश बार्देशकर, वकील अमर यळ्ळूरकर, सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुस्कर यांच्यासह 40 हून अधिक समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.