कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्राचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दुपारी 12: 40 वाजता होणारी नियोजित बैठक तूर्तास रद्द झाली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालामुळे सदर बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही बैठक कधी होणार याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सदर बैठक रद्द झाली असल्याचे समोर येत असले तरी सीमा प्रश्नाची बैठक अमित शहा यांनी टाळली का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.शिंदे गटाच्या खासदारांकडून सुद्धा भेटीचे प्रयत्न सुरू होतेत्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या खासदारांना मिळालेली वेळ रद्द झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळं सीमावादावर पहिली भेट कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदैव महाराष्ट्राला सापत्न वागणूक देणाऱ्या केंद्रीय गृह मंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदींची परत एकदा महाराष्ट्र बाबतची भूमिका समोर आली आहे. बेळगावसह सीमा भागात सध्या चालू असलेल्या घाडामोडीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मराठी माणसावर चालू असणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठी खासदारांनी जी भूमिका घेतली ती अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी समोर आली मात्र निवडणूक निकालाच्या निमित्ताने ती रद्द झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ पूर्वनियोजित मागून घेतले होती पण या बैठकीला वाटाण्याच्या अक्षता लावायचं काम दिल्लीश्वरानी नेहमीप्रमाणेच केले.
महाराष्ट्राच्या प्रत्येक सीमेवर आता एक प्रकारचे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे नांदेड कडून आंध्र प्रदेश मध्ये जाण्याची मागणी होते डांग उमरगा मधील काही भाग गुजरातला जोडण्याची मागणी होते तर सांगली जत मधील काही भाग हा कर्नाटकाचा आहे असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करतात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एका विचित्र मानसिकतेत अडकला आहे आणि ही महाराष्ट्राची अवस्था महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घालण्याची गरज होती मात्र गुरूवारी होणारी बैठक रद्द झाली आहे
एकीकडे दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार शांत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उठवला त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार कुठेही एकवटताना दिसले नाहीत.काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या खासदारांनी सुप्रियाताई यांना पाठिंबा दिला उर्वरित शिंदे गट आणि भाजपच्या खासदारांनी सुप्रियाताईंना पाठिंबा दिलाच नाही. भाजप आणि शिंदे गटातील खासदार गैरहजर राहिले.
एकीकडे कर्नाटकातील सर्व खासदार सुप्रियाताईंना संसदेत बोलतेवेळी विरोध करताना दिसत होते तर महाराष्ट्रातील खासदार एकसंघ नव्हते यावरून बेळगाव सीमा प्रश्नावरून महाराष्ट्रातील खासदार एकसंघ नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
कर्नाटकातील पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राला पणाला लावून कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई यांची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. भाजपच्या या प्रयत्नात महाराष्ट्राचे मात्र मोठेच नुकसान झाले महाराष्ट्राच्या सगळ्या सीमा अस्वस्थ बनल्या आहेत. भाजपची ही खेळी मात्र त्यांच्या व महाराष्ट्राच्या अंगलट येत आहे. कर्नाटक भाजपाला फायदा तर महाराष्ट्र भाजपला तोटा असा निष्कर्ष निघाला आहे. वनवास मात्र महाराष्ट्रालाच भोगण्याची पाळी आलेली आहे. या एकसंघ महाराष्ट्राचे आजपर्यंतची तेवत असणारी ज्योत यानिमित्ताने फडफडत आहे.महाराष्ट्र चार-पाच तुकड्यात विभागाला जावा हीच महाराष्ट्र भाजपची इच्छा आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्रीयन जनता क्रोधाने विचारत आहे!!