कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई बंगळुरू किंवा दिल्लीत नव्हे तर गुजरात मधील अहमदाबाद विमान तळावर झाली मात्र सदर भेटीत त्यांची काय चर्चा झाली हे मात्र समोर आले नाही.
भूपेंद्र पटेल यांनी आज सोमवारी (दि.१२) गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री एच. बी. सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांची उपस्थिती होती.
शपथविधी सोहळ्यानंतर सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची पहिल्यांदाच भेट झाली.
अहमदाबाद विमानतळावर झालेल्या भेटी प्रसंगी दोन्ही मुख्यमंत्र्या सोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. विमानतळावर शिंदे आणि बोम्मई यांच्यात काही वेळ चर्चा झाली मात्र सदर चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाले याचा तपशील कळाला नाही.
आगामी 14 किंवा 15 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या दोघांची बैठक बोलवणार आहेत त्या बैठकीच्या अगोदरच या दोघां मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत कुतहुल निर्माण झाले आहे.