प्रशासकीय पातळीवर मोठा बदल घडवताना राज्य सरकारने तब्बल 42 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अलीकडच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
सरकारने बदली आदेश बजावलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुषार गिरीनाथ (मुख्य आयुक्त बीबीएम), एस. उमेश शंकर (अप्पर मुख्य सचिव सहकारी खाते), रित्विक राजन पांडे (जंटी संचालक महसूल खाते), मनी वन्नण पी. (मुख्य संचालक समाज कल्याण खाते), नवीन राज (मुख्य संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते), मोनीश मौदगल (आयुक्त महसूल व भू दाखला खाते), डॉ. त्रिलोकचंद्र (विशेष आयुक्त बीबी एमपी),
मोहन राज (व्यवस्थापकीय संचालक कर्नाटक शहर पाणीपुरवठा व शुद्धीकरण मंडळ), वाणी रेड्डी विजय जोत्स्ना (व्यवस्थापकीय संचालक कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन), डॉ. राजेंद्र के. (सहकार संघटनांचे निबंधक), मंजुनाथ जे. (आयुक्त आयुष्य खाते), एम. जी. हिरेमठ (प्रादेशिक आयुक्त बेळगाव), रमेश बी. एस. (जिल्हाधिकारी चामराजनगर),
यशवंत गुरुकर (जिल्हाधिकारी कलबुर्गी), शीला नाग (आयुक्त ग्रामीण विकास खाते), गुरुदत्त हेगडे (जिल्हाधिकारी धारवाड), रघुनंदन मूर्ती (जिल्हाधिकारी हावेरी) गंगाधर स्वामी (उपसंचालक ग्रामीण विकास आणि पंचायत राज खाते), आनंद प्रकाश मीना (उपसंचालक कल्याण कर्नाटक प्रदेशाभिवृद्धी मंडळ) आदींचा समावेश आहे.