शेतात जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हलगा येथे घडली आहे.
भैरू गुंडू मोरे वय 72 असे या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भैरु हे रविवारी दुपारी चार वाजता आपल्या शेतात जनावरांसाठी चारा आणायला गेले असताना अचानक पणे मधमाशांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.
मधमाशांनी त्यांच्या तोंडावर व हातावर मोठ्या प्रमाणात चावा घेत हल्ला केला त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.