बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून कुणाला उमेदवारी मिळणार? निवडणूक जरी काही महिने अंतरावर असली तरी आताच बेळगाव उत्तरच उत्तर शोधण्यासाठी काँग्रेसच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.
माजी आमदार फिरोज सेठ त्यांचे पुत्र फैजान सेठ आणि महानगर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ या एका कुटुंबातील तीन सदस्यांसह माजी नगरसेवक अजीम पटवेगार,सिद्दीकी अंकलगी या मुस्लिम समाजातील चेहऱ्यासह जुने जाणते काँग्रेसचे कार्यकर्ते हाशिम भावीकट्टी यांनी इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे.
सुधीर गड्डे,किरण साधून्नावर विनय नावलगट्टी,बसवराज येळळूरकर हे चेहरे देखील नॉन मुस्लिम उमेदवार म्हणून तिकिटासाठी रेस मध्ये आहेत.
बेळगाव उत्तर मधून काँग्रेस साठी लिंगायत समाजातील उमेदवाराला तिकीट मिळणार याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाले होते विनय नावलगट्टी आणि किरण साधून्नावर या दोन लिंगायत नेत्यांमध्ये चुरस आसल्याची रंगली चर्चा असताना मुस्लिम समाजातील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते हाशिम भावीकट्टी यांनी दिल्ली मुक्कामी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.
हाशिम भावीकट्टी यांनी इच्छुक म्हणून अर्ज केल्या नंतर दिल्ली मुक्कामी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सदिच्छा भेट घेतली.
हाशिम भावीकट्टी हे बेळगाव काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार श्याम घाटगे देखील उपस्थित होते. घाटगे हे खर्गे यांचे जवळीक मानले जातात घाटगे आणि हाशिम भावीकट्टी या दोघांनी दिल्ली दरबारी एआयसीसीकडे आता पासूनच लॉबिंग सुरू केल्याने बेळगावच्या काँग्रेसच्या गोटात चर्चेचा विषय बनला आहे. खर्गे यांनी हाशिम भावीकट्टी यांना सकारात्मक उत्तर दिले त्यामुळे बेळगाव उत्तर मधून हाशिम भावीकट्टी यांची दावेदारी देखील मजबूत होताना दिसत आहे.
हाशिम भाविकट्टी हे 1984 साली पासून बेळगाव काँग्रेस मध्ये सक्रिय असून युथ काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्य केले होते.के पी सी सी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
दक्षिण बेळगावातून हे आहेत ईच्छुक
बेळगाव दक्षिण मधून काँग्रेसकडे दोन मराठा चेहऱ्यानी अर्ज केला आहे त्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल,जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी एस एम बेळवटकर यांनी तर प्रभावती चावडी या विणकर समाजातील महिला कार्यकर्ता आणि अन्य एका वकिलाने अर्ज दाखल केला आहे.बेळगाव दक्षिण मध्ये मराठा मतदारांची संख्या पहाता काँग्रेस मराठा समाज की नॉन मराठा उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.