बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चार विधेयके मांडण्यात आली आणि मंजूरही करण्यात आली.
यामध्ये शैक्षणिक संस्थांमधील पदांमध्ये तसेच राज्य सेवा आयोगामधील नियुक्त्या किंवा पदांसाठी कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाचे विधेयक यासह चार विधेयके मंजूर करण्यात आली.
कर्नाटक जमीन महसूल (दुसरी दुरुस्ती) विधेयक – २०२२, कर्नाटक विशेष गुंतवणूक क्षेत्र विधेयक – २०२२, कर्नाटक सीमाक्षेत्र विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक – २०२२ आदी विधेयके मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्री आर. अशोक, मुरुगेश निराणी, व्ही. सुनील यांनी मांडली.
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्या आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स (कर्नाटक सुधारणा) विधेयक २०२१ मागे घेण्याच्या निर्णयाला विधानसभेने तात्पुरती स्थगिती दिली.
गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्या आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स (कर्नाटक सुधारणा) विधेयक-२०२१ मागे घेण्याच्या निर्णयाला विधानसभेने तात्पुरती स्थगिती दिली. तांत्रिक आणि स्पष्टतेची गरज असल्याने हे विधेयक मागे घेण्यास विलंब होत आहे, असे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी म्हणाले.