बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी दुसऱ्यांदा देसूर भागातील शेतकऱ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या होत्या त्याला शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. जवळपास ४५० हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले
ममता होसगौडर ,विशेष भूसंपादन अधिकारी यानी बेळगाव तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांचे आक्षेप बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गा विरोधात नोंद करून घेतले.
शेतकऱ्यांचे आक्षेप रेल्वे बोर्ड, आणि मुख्यमंत्र्यांना लिहून कळवितो असे ममता होसगौडर यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतात भू संपादना साठी पाय ठेऊ नये आपण आपल्या सुपीक शेतातून हा मार्ग होऊ देणार नाही कोणतीही अघटित घटना घडल्यास जिल्हा प्रशासन, खासदार मंगला अंगडी, आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक के आय डी बी अधिकारी धारवाड या जबाबदार असतील असे शेतकऱ्यांनी बजावले.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांनी बेळगाव ते धारवाड पर्यंतचे अंतर कमी करण्यासाठी कित्तूर मार्ग रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यावेळी शेतकऱ्यांनी सुपीक जमिनीतून जाणाऱ्या या मार्गाला तीव्र विरोध दर्शवला होता तसेच स्वखर्चाने सर्वेक्षण करून पर्यायी मार्ग दाखविला होता. तरीही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गेल्या कांही महिन्यांपासून भूसंपादनासाठी नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या त्याला शेतकऱ्यांनी सडेतोड उत्तर देत दुसऱ्यांदा आक्षेप नोंदवला आहे
निवेदन देताना ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर, परशराम कोलकार,संगप्पा कुंभार,पुंडलिक मेलगे,सुभाष कुंभार ,श्रीकांत पाटील,शिवाजी पाटील,संजय सिध्दांनि,परशराम जाधव,अप्पाजी पाटील,किरण लोंढे, राजेंद्र पाटील, सदस्य रामदास जाधव सुधाकर पाटील,आणि इतर शेतकरी उपस्थित होते.