बेळगाव लाईव्ह : बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध ठिकाणाहून आलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या भोजन व्यवस्थेची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी केली.
मंगळवारी भोजन केंद्राला भेट देऊन जेवणाचा दर्जा आणि तेथील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी भोजन व्यवस्थेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अन्न पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच जेवणाची गुणवत्ता तसेच स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या.
कोणतीही समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त तसेच अन्न उपसमितीच्या प्रमुख गीता कौलगी, अन्न सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, भुलेखा विभागाचे सहसंचालक निसार अहमद, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर, सिद्धेश्वरप्पा जी.बी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.