टिळकवाडी येथील निसर्गरम्य व्हॅक्सिन डेपो परिसराला आज सकाळी सकाळी इंग्लंडच्या एका ब्रिटिश गृहस्थाने भेट देऊन स्थानिक मॉर्निंग वॉकर्स बरोबर फेरफटका मारत परिसराची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
एक ब्रिटिश गृहस्थ मंडोळी परिसरातील आपल्या परिचितांकडे लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून बेळगावला आले आहेत.
निसर्गाची आवड असणाऱ्या या गृहस्थांचे आज सकाळी सकाळी व्हॅक्सिन डेपो येथे आगमन झाले. त्या ठिकाणी त्यांची सकाळी फिरावयास आलेले समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी भेट झाली.
त्यावेळी साळुंखे आणि त्यांच्या मॉर्निंग वॉकर्स सवंगड्यांनी त्या ब्रिटिश गृहस्थांना व्हॅक्सिन डेपोचे महत्त्व सांगताच त्यांनी त्या सर्वांसमवेत डेपोत फेरफटका मारला. त्या ठिकाणची वृक्षवल्ली पाहून आणि स्वच्छ आल्हाददायक वातावरण अनुभवून खुश झालेल्या त्या गृहस्थांनी व्हॅक्सिन डेपो परिसराची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
याप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या समवेत भरत शानभाग, डॉ. संतोष पाटील, विद्यानंद सानिकोप, सारंग, संतोष शिरोशी, कर्वालो, दीपक मिठारे आदी उपस्थित होते.