बेळगाव विमानतळाचा नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 25 जानेवारी 2019 रोजी सुरू झालेल्या उडान (उडे देश का आम नागरिक) या प्रमुख प्रादेशिक संपर्क योजनेतील (आरसीएस) अंतर्भागास 3 वर्षे पूर्ण झाली असून उडान योजनेअंतर्गत पहिल्या विमानाने 1 मे 2019 रोजी बेळगाव विमानतळावरून आकाशात झेप घेतली होती.
उडान -3 योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळाशी जोडल्या गेलेल्या आरसीएस मार्गांपैकी बहुतांश मार्गांची व्यवहार्यता अंतर वित्त पोषण योजना (व्हीजीएफ) कालबाह्य झाली आहे, तर योजनेचा फायदा समाप्त होण्यापूर्वीच कांही मार्गावरील विमान सेवा खंडित करण्यात आली आहे. उडान योजनेच्या इतिहासातील बेळगाव विमानतळ हे देशातील एकमेव असे विमानतळ आहे की या विमानतळाला सर्वाधिक हवाई मार्ग जोडले गेले आहेत.
उडान योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळाच्या 13 मार्गांवर स्पाइस जेट, इंडिगो, अलाईन्स एअर, स्टार एअर आणि ट्रू जेट या विमान कंपन्यांकडून दररोज 34 विमान फेरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे प्रवासी संख्या विमानांचे चलनवलन आणि कार्गो वाहतुकीमध्ये जवळपास 3 वर्षे बेळगाव विमानतळ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होते.
व्हीजीएफ सवलतीसह उडान अंतर्गत बेळगावच्या आरसीएस आणि नाॅन आरसीएस विमानसेवा पुढीलप्रमाणे आहेत.
उडान मार्ग : बेळगाव -हैदराबाद, विमान कंपनी : स्पाईस जेट, शुभारंभ तारीख : 1-5-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव -पुणे, विमान कंपनी : अलाईन्स एअर शुभारंभ तारीख : 15-5-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – अहमदाबाद, विमान कंपनी : स्टार एयर, शुभारंभ तारीख : 1-5-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव -मुंबई, विमान कंपनी : स्पाईस जेट, शुभारंभ तारीख : 20-6-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – मुंबई, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 6-9-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव -हैदराबाद, विमान कंपनी : इंडिगो, शुभारंभ तारीख : 27-10-2019, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव -हैदराबाद, विमान कंपनी : ट्रू जेट, शुभारंभ तारीख : 17-1-2020, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव -म्हैसूर, विमान कंपनी : ट्रू जेट, शुभारंभ तारीख : 17-1-2020, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – तिरुपती, विमान कंपनी : ट्रू जेट, शुभारंभ तारीख : 17-1-2020, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – इंदोर, विमान कंपनी : स्टार एअर शुभारंभ तारीख : 20-1-2020, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – इंदोर, विमान कंपनी :
स्टार एअर शुभारंभ तारीख : 20-1-2020, उडान फायदे : कालबाह्य. उडान मार्ग : बेळगाव – कडाप्पा, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 1-3-2020, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – सुरत, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 25-12-2020, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – नासिक, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 25-1-2021, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – जोधपूर, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 16-2-2021, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – तिरुपती, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 11-10-2021, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – नागपूर, विमान कंपनी : स्टार एअर, शुभारंभ तारीख : 16-4-2022, उडान फायदे : कार्यरत. उडान मार्ग : बेळगाव – जयपूर, विमान कंपनी : स्टार एअर, मात्र सेवा अद्याप सुरू नाही.