बेळगाव भागात पिकणारी मसूर दर्जेदार म्हणून ओळखली जाते. यंदा खराब हवामानासह मसूर पिकाला रोगाने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तथापि निराश झालेल्या शेतकऱ्यांना बहरलेल्या मोहरी व काळा वाटाण्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
बेळगाव भागात पिकणारी मसूर नामांकित दर्जेदार म्हणून ओळखली गेल्याने ती देशात तसेच परदेशातही तिच्या चवीचा मोह आहे. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील व्यापारी बेळगावमध्ये येऊन मसूर खरेदी करुन घेऊन जातात.
गेल्यावर्षी व यावर्षी रब्बी हंगामातील खराब हवामानामुळे मसूर पीकं अत्यल्प आले. अनेक शेतकऱ्यांना तर बीयाणापूरतेही ते मीळाली नाही. यावर्षी मसूरवर मर रोग असून मसूर पिकावर औषध फवारणी करुन शेतकरी थकले आहेत. या रोगामुळे पूढच्या वर्षी पेरण्यापूरती तरी मसूर मिळण्याची चिन्हच धूसर झाली आहेत.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मसूर बियाणं 300/350 रु. किलोने खरेदी करुन एकरी 30/40 किलो पेरली आहे. मात्र आता त्यावर पडलेल्या रोगामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे. तथापी मधे वरे म्हणून पेरलेली मोहरी सध्या बहरली असून काळा वाटाणा देखील बहरलेला पाहून थोडा दिलासा मिळाल्याने कांही अंशी शेतकरी समाधानी झाला आहे.
कृषी खात्याकडून मसूर पिकावर वीमाच नाही. त्याचबरोबर नुकसान भरपाईसुध्दा मीळत नसल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.