Friday, April 26, 2024

/

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून ‘यांची’ निर्दोष मुक्तता

 belgaum

बेळगाव : चव्हाट गल्ली, झाडशहापूर येथे २५ मार्च २०१९ रोजी रंगपंचमी साजरी करत असताना झालेल्या वादावादीत सचिन मल्लाप्पा गोरल (वय २०) या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप संकेत मल्लप्पा मरवे (वय २१), मनोज मल्लाप्पा मरवे (वय २२), अमोल नारायण मरवे (वय २२), भालचंद्र परशराम सावंत (वय २०) सर्वजण राहणार झाडशहापूर, ता. जि. बेळगाव आदींवर करण्यात आला होता.

याप्रकरणी मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफाहुसेन सय्यद यांनी साक्षीदारांच्या विसंगतीमुळे उपरोक्त सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. झाडशहापूर येथे रंगपंचमी साजरी करत असताना सचिन गोरल या तरुणावर उपरोक्त चौघांनी तलवार, फावडा, वीट यासह विविध गोष्टींच्या माध्यमातून प्राणघातक हल्ला केला आणि यामुळे सचिन गोरल गंभीर जखमी झाला.

त्यानंतर तेथील ज्योतिबा, संजय, अरुण, अनंत आदी प्रत्यक्षदर्शींनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अशी माहिती मिळाली. यानंतर सचिन गोरल याचे मामा भारत बिदरभावी यांनी घडल्या प्रकाराबद्दल वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.

 belgaum

यानुसार वडगाव ग्रामीण पोलिसांनी चारही संशयित आरोपींवर भा. दं. वि. ३०७, ५०४, ५०६ सहकलम ३४ अन्वये न्यायालयात दोषारोप पात्र दाखल केले. सदर प्रकरणी मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफाहुसेन सय्यद यांनी १४ साक्षीदार, ७ मुद्देमाल, १४ कागदपत्रे तपासून साक्षीदारांमध्ये विसंगती आढळून आल्याने उपरोक्त चारही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपींच्यावतीने ऍड. प्रताप यादव, ऍड. हेमराज बेंचन्नावर, ऍड. स्वप्नील नाईक यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.