राष्ट्रवादी इंजिनियर सेल राज्य समन्वयक, बेळगाव म. ए. समितीचे युवा नेते अमित देसाई यांनी मुंबई मुक्कामी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेत बेळगाव सीमा प्रश्ना संदर्भात चालू घडामोडी वर भेट घेत सविस्तर चर्चा केली.
गुरुवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईत भेट घेतली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी
बेळगाव सह सीमा भागातील सध्या स्थितीतील परिस्थिती जाणून घेत मराठी भाषिकांच्या रक्षणासाठी कटिबध्द असल्याचे आश्वासन दिले.
बेळगावाच्या व मराठी जणांच्या रोजच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी अमित देसाई यांनी सांगितले.सीमा भागाच्या शरद पवार यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली याप्रसंगी वैभव कोकाट उपस्थित होते.
पवार यांनी यावेळी जवळपास अर्धा तास हून अधिक काळ चर्चा केली त्यात सीमा भागातील घडामोडी,सध्या परिस्थितीत काय करण्याची गरज यावर सविस्तर चर्चा केली.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी 48 तासात जर बेळगाव सह सीमा भागातील परिस्थिती सुधारली नाही तर मीच स्वतः बेळगावला जाणार असं जाहीर केलं होतं त्यानंतर महाराष्ट्र खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या झालं होतं आणि अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती.
या नंतरही शरद पवार यांनी बेळगाव विषयी सर्व माहिती जाणून घेत सीमा भागाचा दौरा करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी अमित देसाई यांच्या कडून सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.