बेळगाव परिसरातील सुपीक शेत जमिनीत चैनबाज युवकांसह मद्यपी मंडळी दारूच्या रंगीत पार्ट्या करत असून शेतांमध्ये जुगार,गांजासह इतर गैर प्रकारही वाढल्याने शेतकरी अत्यंत हैराण झाले आहेत. तसेच पोलिसांनी या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव परिसरातील सुपीक शेत जमिनीत दारु ढोसत पार्ट्या, सिगारेट, जूगार, गांजा ओढून जातानां भांडण झाल्यास दारूच्या काचेच्या बाटल्या फोडणे. सिगारेट गांजा पेटवताना शेतातील गवताच्याच नव्हे तर भाताच्या गंज्यानां अनेकवेळा आगीही लावल्या आहेत.
मद्यपी सर्व उरकल्यावर तिथून जातानां सर्व कचरा तिथेच टाकून जातात आणि तो गोळा करायचा त्रास मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. फुटलेल्या बाटल्यांचे काचांचे तुकडे शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी अपायकारक ठरत आहेत.
दारुड्यांचा वावर इतका वाढला आहे की शेतकरी महिला शेतात जाणेही कठीण होऊन बसलं आहे. दारुड्यांच्या त्रासात भर म्हणून आता तेथील उरलेले कांही खायला मीळते का म्हणून मोकाट कुत्र्यांचे कळपही शेतात ठाण मांडूण असतात. त्यामूळे तर आता शेतकऱ्यांमध्ये भिताचे वातावरण पसरले आहे.
दारुड्यांच्या उपद्रवाबद्दल मागच्यावेळी रयत संघटनेतर्फे वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस निरिक्षक सुनिलकुमार नंदेश्वर तसेच अबकारी खात्यालाही प्रत्यक्ष लेखी निवेदन दिले होते. पण ते तत्पूरते ठरले, कारण कोणतीच ठोस कारवाई झाली नाही.
त्यामूळे आता शेतामध्ये दारुडे, सिगारेट, गांजा उडणारे आणि पार्ट्या करणाऱ्यांचा वावर जास्तच वाढला आहे. अलिकडे जिल्हा पोलिस प्रमुखांनी फोन इन कार्यक्रमात यावर तक्रार करावी म्हणून शेतकरी नेते राजू मरवे यांनी अनेकवेळा प्रयत्न केला पण फोन कांही लागला नाही. तेंव्हा संबधीत पोलिस खात्याने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देत उपरोक्त गैरप्रकारांना आळा घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे कांही गैर कृत्य दिसल्यास तात्काळ तक्रार निवारण करण्यासाठी पोलिस खात्याने संपर्क नंबर दिल्यास शेतकऱ्यांना सोईचे होईल, असे मतही व्यक्त केले जात आहे.