मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
कुस्ती आखाड्याचे उदघाटन रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते होणार आहे, तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे. छ.शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन भूषण काकतकर यांच्या हस्ते तसेच हनुमान प्रतिमेचे पूजन माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल
यांच्या हस्ते होणार आहे. महिला कुस्तीचे उद्घाटन साधना पाटील यांच्या हस्ते होईल.
सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. नागराज बसिढोनी कर्नाटक केसरी विरुद्ध पै. पाॅक्सिंग कुमार पंजाब नॅशनल चॅम्पियन यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. परशराम हरिहर दावनगीरी विरुद्ध पै. परमानंद इंगळगी नॅशनल चॅम्पियन यांच्यात तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. सुनील धारवाड नॅशनल चॅम्पियन विरुद्ध पै. ऋतुराज शेडगे कोल्हापूर चॅम्पियन, चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै. पावन चिक्कदिनकोप विरुद्ध पै. लक्ष्मण जाधव इचलकरंजी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती पै. रोहित पाटील कंग्राळी विरुद्ध पै. शिवानंद आंबी कोल्हापूर कशी खेळविली जाईल या जंगी कुस्ती मैदानात 50 हून अधिक चटकदार कुस्त्या होणार आहेत.
त्याचबरोबर आकर्षक गदा पटकावण्यासाठी पै. यशपाल राजस्थान विरुद्ध पै. दीपक धारवाड यांच्यात तसेच मेंढ्यासाठी पै. ओम घाडी येळ्ळूर आणि पै. ओंकार बागेवाडी आणि पै. श्री घाडी येळ्ळूर विरुद्ध पै. सलील यांच्यात आकर्षक लढत होणार आहे.
त्याचबरोबर महिलांच्या कुस्तीचे आकर्षणही या आखाड्यात असणार आहे. पै. कल्याणी आंबोलकर विरुद्ध पै. ममता खानापूर, पै. जान्हवी किणये विरुद्ध पै. भक्ती मोदेकोप यांच्यासह महिलांच्या 10 हून अधिक जंगी कुस्त्या होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.