कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून येत्या सोमवार दि 19 ते गुरुवारी 29 डिसेंबर 2022 या कालावधीत हे अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे.
प्रारंभी हे अधिवेशन 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता 19 ते 29 डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हे अधिवेशन होईल.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत अधिवेशना बाबत हा निर्णय घेण्यात आला. विधान सौध मधील कॅबिनेट हॉल मधील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आमदार अधिकारी मंत्री या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आता 19डिसेंबर 29डिसेंबर दरम्यान राज्याचा कारभार बेळगावातून चालणार आहे.