भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासमवेतेच्या मतदार यादीत किरकोळ दुरुस्तीसाठीचे (प्रारूप मतदार यादी) वेळापत्रक जाहीर केले असून तक्रारी दाखल करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर ही आहे. त्याचप्रमाणे तक्रार निवारण 26 डिसेंबरला होऊन अंतिम यादी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केले जाणार जाईल, असे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
येत्या 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व 18 वर्षे वर्षावरील लोकांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नांव नोंदणीसाठी अर्ज नमुना -6, मतदार यादीतून नांव वगळणे अथवा नांव रद्द करण्यासाठी अर्ज नमुना -7, मतदार यादी मधील नावात दुरुस्ती, पत्ता बदलणे, दिव्यांग असल्यास त्यासंबंधी नोंद व मतदान पत्राच्या नमुन्यासाठी अर्ज नमुना -8 सादर करावयाचा आहे. कच्ची मतदार यादी 9 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच निवडणूक अधिकारी बंगळूर Website:ceokaranataka.kar.nic.in वर उपलब्ध असेल. सध्या मतदार यादीत नांव असलेल्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मतदारांसाठी VOTERS HELPLINE APP (VHA) हे ॲप व WWW.NVSP.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. VHA गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे ॲप व WWW.NVSP.in या वेबसाईटद्वारे अर्ज नमुना 6, 7, 8 सादर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची यादी (अनुक्रमे मतदार संघ, नोंदणी अधिकारी व सहाय्यक नोंदणी अधिकारी यानुसार) पुढील प्रमाणे आहे. निपाणी : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार निपाणी. चिकोडी -सदलगा : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार चिक्कोडी. अथणी : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार अथणी. कागवाड : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार कागवाड. रायबाग (एससी) : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार रायबाग. कुडची (एससी) : प्रांताधिकारी चिक्कोडी, तहसीलदार रायबाग. हुक्केरी : प्रांताधिकारी बेळगाव, तहसीलदार बेळगाव. यमकनमर्डी (एसटी) : प्रांताधिकारी बेळगाव, तहसीलदार हुक्केरी. बेळगाव उत्तर : आयुक्त महापालिका, परिषद सचिव महापालिका. बेळगाव दक्षिण : आयुक्त महापालिका, महसूल
अधिकारी महापालिका. बेळगाव ग्रामीण : प्रांताधिकारी बेळगाव, तहसीलदार बेळगाव. खानापूर : प्रांताधिकारी बेळगाव, तहसीलदार खानापूर. अरभावी : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार मुडलगी. गोकाक : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार गोकाक. कित्तूर : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार कित्तूर. बैलहोंगल : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार बैलहोंगल. सौंदत्ती -यल्लमा : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार सौंदत्ती. रामदुर्ग : प्रांताधिकारी बैलहोंगल, तहसीलदार रामदुर्ग.