महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापुरातील एकी संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पाऊल पुढे टाकत मध्यवर्ती चे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्यवर्ती समितीचे नेते राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती समिती चे सदस्य बुधवारी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेणार आहेत. खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते नेते यांच्या सोबत बैठक करणार आहेत.
बुधवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता ही बैठक होणार असून खानापूरातील दोन्ही गटाच्या
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजर राहावेअसे आवाहन मध्यवर्ती समितीने केले आहे.मागील काही दिवसापूर्वी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यात एकी करून समिती बळकट करण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील कार्यकर्ते व नेते मंडळी यांनी मध्यवर्ती म ए समितीच्या पदाधिकारी भेट घेऊन चर्चा केली होती खानापूर येथे बैठकीचे आयोजन करून मार्ग काढण्यासाठी सहाय्य करावे अशी विनंतीही केली होती.
यासंदर्भात मध्यवर्ती म. ए.समितीच्या सुकाणू समिती सभासदांची बैठक सोमवारी दीपक दळवी यांच्याअध्यक्षतेखाली झाली त्या बैठकीत राजाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवार दिनांक 9नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:00वाजता खानापूर येथील शिवस्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर व इतर खेड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर हजर राहून आपली मते मांडावीत असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.