खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या विभागलेल्या दोन्ही गटात एकीच्या दृष्टीने गेल्या 9 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे निरीक्षक म्हणून राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व इतर सदस्यांच्या शिष्टमंडळाने खानापूर येथील शिवस्मारक येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकीची घोषणा करताना आठ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती,
या समितीवर खानापूर तालुक्याच्या दौऱ्यात गावोगावी जाऊन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली.
याचाच पुढील भाग म्हणून आज सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी या आठ सदस्यीय समितीची बैठक शिवस्मारक येथे पार पडली व या बैठकीत उद्या 15 नोव्हेंबर पासून पहिला संपर्क दौरा गर्लगुंजी येथून सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
गर्लगुंजी येथील लक्ष्मी मंदिर येथे उद्या मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी तालुक्यातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी, समितीप्रेमी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी गोपाळराव देसाई,प्रकाश चव्हाण,यशवंत बिर्जे, धनंजय पाटील,राजू पाटील,किशोर हेब्बाळकर,रमेश धबाले,हणमंत मेलगे उपस्थित होते.