निपाणी तालुक्यातील कारदगा गावात येत्या २७ नोव्हेंबर रोजी २५ वे रौप्यमहोत्सवी कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कारदगा साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद यांनी दिली. कारदगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काशिद यांनी साहित्य संमेलनाची रूपरेषा सांगितली.
रौप्य महोत्सवी ग्रामीण साहित्य संमेलन सीमाभागातील साहित्य रसिकांसाठी पर्वणीच आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रके वाटप, व्यासपीठाची उभारणी, साहित्यिक व मान्यवरांच्या भेटी, देणगी संकलन असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
२७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने होणार आहे. पुस्तक प्रकाशन, साहित्यिकांची व्याख्याने, काव्यवाचन, परिसंवाद आणि मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहेत.
या संमेलनात साहित्य रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाश काशीद यांनी केले. यावेळी रावसाहेब सावंत यांनी स्वागत केले. या पत्रकार परिषदेस बाळासाहेब नाडगे, महादेव दिंडे, महावीर पाटील, भगवंत कुलकर्णी, सदाशिव खोत, रंगराव बन्ने आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन होते माचीगड कारदगा कडोली उचगाव बेळगुंदी सांबरा येळळूर यासह बेळगाव शहरात अशी विविध साहित्य संमेलनांचे आयोजन बेळगाव येथील साहित्य संघटनेच्या वतीने करण्यात येते त्यासाठी महाराष्ट्रातून जेष्ठ साहित्यिकांची हजेरी लागत असते.