देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वर खुनाचा गुन्हा नोंद झाला नव्हता का?ते खून प्रकरणातील आरोपी नव्हते का?तडीपारी त्यांच्यावर झाली नव्हती का?असा प्रतिप्रश्न कर्नाटकाचे विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केला.
सोमवारी सकाळी बेळगांव विमानतळावर कित्तूर येथे काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाले असता माध्यमांशी बोलत होते.खुनाचा आरोप असलेल्या कुलकर्णी यांचा जन्मदिन इतक्या जोरात का?असा प्रश्न विचारला असता ते बोलत होते.
अनेकांवर खुनाचा आरोप झालाय ते आमदार खासदार मंत्री झाले आहेत त्यामुळे जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर त्यांना दोषी मानता येत नाही तसेच केंद्रीय गृह मंत्र्यावर खुनाचा आरोप होता की नाही असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला . माझे डी के शी यांचे संबंध चांगले आहेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्यात चांगले संबंध आहेत का? असा प्रतिप्रश्न त्यांनी डी के शिवकुमार आणि तुम्ही एकत्रित का आला नाही यावर उत्तर देताना केला.
आगामी निवडणूक निवडणुकीसाठीमतदारसंघनिवडीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या सिद्धरामय्या यांनी बदामी मैदान सोडण्याबाबत अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय.
सिद्धरामय्या यांच्यासाठी मतदारसंघ नसल्याचे भाजपला प्रत्त्युत्तर देत भाजपला डोकं नाही आहे.फील्ड नसेल तर बरेच लोक मला स्वीकारतील का? बदामी क्षेत्रातूनच निवडणूक लढावी यासाठी मोठे दडपण आहे. हजारो महिलांनी घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र दिले आहे. अनेक मतदार संघातून मला निवडणूक लढवण्याची ऑफर आहे असेही त्यांनी म्हटंलय.
मी आठवड्यातून एकदा देखील बदामीला येऊ शकत नाही कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यांच्या कष्टांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत.तेथील लोकांची मागणी आहे मात्र मला ते पटणार नाही उद्या तिथं जायचे होते पण रद्द झालं आहे कोलार वरुणा आणि चाम्राजपेठ मधून निवडणूक लढा अश्या विनंत्या येत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले