Thursday, December 19, 2024

/

ग्रामीण आमदारांबाबत माजी आमदाराचे वक्तव्य

 belgaum

काँग्रेसच्या ग्रामीणच्या विद्यमान आमदार आणि त्यांचे बंधुराज विधानपरिषद सदस्य दोघेही भाजपामध्ये प्रवेश करणार ही बातमी खरी आहे असा नवीन राजकीय बॉम्ब बेळगाव ग्रामीणचे भाजप अध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील टाकला आहे.

बेळगावात आयोजित ते पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजप हा उगवणारा सूर्य आहे तर काँग्रेस मावळनारा सूर्य आहे उगत्या सूर्याला सगळे जण नमस्कार करतात त्यामुळे आमदार हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू हट्टीहोळी भाजपत प्रवेश करणार आहेत ही बातमी आहे असा नवीन राजकीय बॉम्ब त्यांनी टाकला आहे.

भाजप पक्षात कुणाला स्थान द्यायचे कुणाला नाही याचा निर्णय हाय कमांड घेत असते ग्रामीण भाजपचे अध्यक्ष असलेल्या संजय पाटील यांनी बेळगावच्या राजकारणात नवीन बॉम्ब टाकून दिली आहे.

माजी आमदारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या ग्रामीणच्या आमदारांची काय प्रतिक्रिया येणार आहे याकडे सर्व सर्व जाणकारांचे लक्ष लागून राहिला आहे.

धारवाड चे माजी आमदार विनय कुलकर्णी हे एका खून प्रकरणातले आरोपी आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे येतात हे कितपत योग्य आहे काँग्रेसला यातून कोणता संदेश द्यायचा आहे असा सवाल देखील करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान संजय पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील सडकून टीका केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.